देवेंद्रजी मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका

0
221

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – सोलापूर मधील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिचे संपुर्ण शरीर रक्ताने माखलेले दिसत आहे.

ही मुलगी पारधी समाजाची आहे. या घटनेची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. राऊत यांनी ट्विट केलं आहे की, देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.