दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

37

भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १० जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता कुणाल आयकॉन रोडवर पिंपळे सौदागर येथे घडली.

अतुल शांतीलाल शहा (वय ५८, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता कुणाल आयकॉन रोडने मोपेड दुचाकी भरधाव वेगात चालवीत जात होते. अचानक दुचाकी घसरली आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटून शहा रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत २१ जानेवारी रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.