दुचाकीस्वारास मारहाण करून लुटले

17

चिखली, दि. २२ (पीसीबी) – लोखंडी रॉडने मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटले. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री घरकुल जवळ, चिखली येथे घडली.

जयगणेश ईसकीआप्पा शिवण (वय 28, रा. घरकुल चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी चार अज्ञात आरोपी तेथे आले. त्यांनी लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. आरोपींनी फिर्यादी जवळ असलेले 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व 1 हजार 500 रुपये रोख असा एकूण 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.