दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

0
370

गती रोधकावरून जाताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आंबेठाण येथे बुधवारी (दि.10) घडला आहे.

दिलीप गेणूभाऊ कदम (वय 53 रा.वासुली) यांचा अपघात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ऋषिकेश शिवाजी बोंबले (वय 24) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काका दिलीप कदम हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना गतीरोधक ओलांडत असताना त्य़ांचे नियंत्रण सुटले व गाडी घसरून खाली पडले. गाडी वेगात असल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.