दारूसाठी पाणी न दिल्याने मारहाण

0
52
crime

दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी,
दारू पिण्यासाठी पाणी दिले नाही म्हणून एकास उलट्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 3) सायंकाळी विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

प्रविण शेळके (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मोतीराम रामभाऊ राव (वय 48, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपीने दारू पिण्यासाठी राव यांच्याकडे पाणी मागितले. मात्र राव यांनी त्याला पाणी दिले नाही. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने फिर्यादी राव यांना उलटा कोयता करून आरोपीने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.