दारूची बाटली दिली नाही म्हणून सहा जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

0
663

वाकड, दि. २७ (पीसीबी) – दारूची बॉटल दिली नाही या रागातून पाच ते सहा जणांनी एका तरुणाला सिमेंट ब्लॉक व दगडाने बेदम मारहाण केली आहे ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री वाकड येथील म्हातोबनगर झोपडपट्टी परिसरात घडली.

याप्रकरणी सुनील मोहन शिंदे (वय 35 रा म्हातोबा नगर वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीवरून अविनाश सिताराम गायकवाड (वय 18 रा थेरगाव) रवींद्र प्रकाश घाडगे (वय 25 रा मारुंजी) साहिल हरिदास शिंदे (वय 21 रा वाकड) यश बाळू शिंदे (वय 19 वाकड) रुपेश राजेश गायकवाड (वय 22 चिंचवड) लक्ष्मण उर्फ परश्या मरीबा तुपेरे (वय 20 रा. वाकड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र उमेश शिंदे हे दारू पीत बसले होते. यावेळी फिर्यादी याने दारूचे बॉटल दिली नाही. म्हणून आरोपींनी फिर्यादीशी भांडण करण्यास सुरुवात केली यावेळी शिवीगाळ व हाताने मारहाण करत रोडवरील सिमेंटचा गट्टू व दगडाने फिर्यादीला मारत जखमी केले तसेच फिर्यादीच्या खिशातील 430 रुपये काढून घेऊन परिसरात मोठे निशे वेगळे देत मी इथला भाई भाई आहे. माझ्या नादाला लागल तर बघून घेईन अशी रवींद्र घाडगे यांनी धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी सहा ही आरोपींना जेरबंद केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.