दारुसाठी पैसे मागत टोळक्याकडून तरुणास मारहाण

0
692

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) : आम्ही अक्या बॉन्ड टोळीचे सदस्य आहोत आम्हाला दारुसाठी पैसे दे म्हणत सात ते आठ जणाच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करत लुटले आहे.ही घटना मंगळवारी (दि.14) चिखली घरकुल येथे घडली.

याप्रकरणी अभिषेक मुकेश कांबळे (वय 24 रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून मन्यो कोरी, अतुल निसर्गंध, जुनेद नायकोडी, आकाश मस्के, बंडु महाकाल, सोहेल पठाण, हतोड्या भोसले व त्याचे इतर साथीदार सर्व रा. चिखली घरकुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र हे चिखली घरकुल परिसरात चायनीज टपरीसाठी जागा पहायला गेले होते. यावेळी मन्या व अतुल यांनी त्यांना दारुसाठी पैसे मागितले. फिर्यादी यांनी त्याला नकार दिली असता आरोपींनी आम्ही इथले भाई आहोत म्हथ शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. इतर आरोपींना बोलावून दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. या झटापटीत फिर्यादी यांच्या हातावर ही आरोपीने चाकुने वार केले. तसेच मन्या याने फिर्यादीला आम्ही बॉन्ड गँगचे भाई आहोत, अक्या बाँड जेलमध्ये असला तरी मी लिडर आहे घरकुलचा अशी दमदाटी करत फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.