दापोडीतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान दिन साजरा

0
216

दापोडी, दि. २६ (पीसीबी) – २६ नोव्हेंबर ‘भारतीय संविधानाच्या वर्धापन’ दिनानिमित्त दापोडीतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच राष्ट्रगीत घेऊन देशाच्या प्रती आदर व्यक्त करण्यात आला. शेवटी 26 नोव्हेंबर मुंबई येथील हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमास तृतीयपंथी, विद्यार्थी, कर्मचारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, व सर्व जाती-धर्माचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम :भारतीय संविधान प्रबोधन विचार मंच दापोडी ” यांच्या वतीने घेण्यात आला.