दसरा अजून दूर आहे…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान

52

 नवी मुंबई, दि.२६ (पीसीबी) : मुंबई उच्च न्यायालायाने दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेना-शिंदे गटातील वाद अधिकच चिघळणार असल्याची शक्यता आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत सूचक विधान केलं आहे.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांना दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णय़ाबाबत विचारले असता, एकनाथ शिंदे म्हणाले की, दसरा अजून दूर आहे. त्याबाबत तुम्हाला लवकरच कळेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या बाबतील आता सस्पेन्स वाढला आहे.

त्याशिवाय पुण्यात पीएफआय पदाधिकांऱ्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याबाबतही त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.” ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचा अधिकार इथे कोणालाही नाही. या ठिकाणी अशा घोषणा खपवून घेतल्या जाणार नाही. देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. सरकार याबाबत गंभीर असून अशा घोषणा देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे एकनाथ शिंदेंनी खडसावून सांगितले आहे. ‘

दरम्यान, आज माथाडी कामगार मेळाव्यात बोलतानाही त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ”राज्यात सत्तांतर होताच विकासाची कामे सुरु झाली आहेत. या राज्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास करण हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ज्या गतीने कामाचा धडाका लावला आहे. ते पाहून लोकांना धडकी भरली आहे. हे उद्योग बाहेर गेले, ते उद्योग बाहेर गेले, असं काहीजण म्हणत आहेत, पण आधीच्या पाच वर्षात किती उद्योग राज्यात आले याचीही माहिती घ्या असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

काल काही लोक बोलले सत्यमेव जयते. आम्ही सत्यासाठी आहोत, अडीच वर्षांपूर्वी झालेली चूक आम्ही दुरुस्त केली आणि तुम्ही ती मान्य केली. त्यामुळे सत्ता आणि सत्य हे कोणीही सागांयची आवश्यकता नाही. जनता सुज्ञ आहे, असही त्यांनी म्हटलं आहे.