दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत डॉक्टर महिलेचा छळ, महिलेची आत्महत्या

295

दिघी, दि. २२ (पीसीबी) – दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत डॉक्टर असलेल्या विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना 15 सप्टेंबर रोजी घडली असून याप्रकरणी 21 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अपर्णा अभिजीत शिंदे (वय 32, रा. डुडळगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अपर्णा यांचा भाऊ घनश्याम पवार (वय 31) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती डॉ. अभिजित अशोक शिंदे (वय 40, रा. डुडुळगाव, ता. हवेली), सासरे डॉ. अशोक बाबुराव शिंदे (वय 67, रा. अहमदनगर), सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे आरोपी अभिजित याच्यासोबत लग्न झाल्यानंतर वेळोवेळी सासरच्या लोकांनी दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. विवाहितेला जमिनीवर नाक घासायला लाऊन हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिला. घरातून हाकलून देत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

अपर्णा यांनी डुडुळगाव येथील राहत्या घराच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.