थोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

0
43
  • माऊली भक्तांची सेवा रुजू

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडीतील वैभव असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरास जिर्णोद्धाराचे कामासाठी माऊली भक्त फरताळे दिंडीचे उपाध्यक्ष व उद्योजक विष्णुपंत झोपे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे कडे सव्वा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

या प्रसंगी भारती झोपे, हेमंत झोपे, पांडुरंग काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. थोरल्या पादुका मंदिराच्या जिर्णोद्धरासह कळसाचे बांधकाम सुरु असून भाविकांनी व माऊली भक्तांनी मंदिरास सढळ हाताने मदत करावी असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष ॲड.विष्णू तापकीर यांनी केले आहे.