थेरगाव रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्नरोट. दत्तात्रय कसाळे अध्यक्ष तर विजय भुसारे सचिव पदी

0
38

दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) – थेरगाव रोटरी क्लबचा वर्ष 2024-25 चा पदाधिकार स्वीकार समारंभ सोहळा म्हणजेच पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करत श्री .गणेशाच्या पूजनाने व दीपप्रज्वलाने या पदग्रहण सोहळ्याला सुरुवात झाली.
या सोहळ्याचे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट जनरल रोटरियन शितल शहा व फर्स्ट लेडी रागिनी शहा, ए जी जगमोहन सिंग, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, उद्योजक काळूराम बारणे, रोटरी क्लब अध्यक्ष सुनील जगताप, नीलांबरी जगताप, सेक्रेटरी दत्तात्रय कसाळे,सीमा कसाळे हे पदग्रहण मंचावर उपस्थित होते. यावेळी हा पदाधिकार स्वीकार समारंभ सोहळा संपन्न होत असताना मावळते अध्यक्ष रोट.सुनील जगताप यांनी नवीन अध्यक्ष रोट. दत्तात्रय कसाळे यांना कॉलर हॅन्ड ओव्हर करत व डी जी रोट.शितल शहा यांनी दत्तात्रय कसाळ यांना पिनिंग करत नवीन अध्यक्ष म्हणून पदनियुक्त करण्यात आले. व मावळते सचिव रोट.दत्तात्रय कसाळ यांनी कॉलर हॅन्ड ओहर करत नवीन सचिव रोट.विजय भुसारे यांना डिजी रोट.शितल शहा यांनी नवीन सचिव विजय भुसारे यांना पिनिंग करत सचिव म्हणून पदनियुक्त करण्यात आले. मावळते अध्यक्ष रोट.सुनील जगताप यांनी मागील वर्षात केलेल्या कामांची माहिती देत. नवीन अध्यक्षांना व सेक्रेटरींना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थापक संदीप गाडे यांनी रोटरी क्लबच्या इतिहासाला उजाळा देत केलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच थेरगाव रोटरी क्लबच्या बिओडी मेंबर्सना सन्मानित करण्यात आले
खासदार श्रीरंग (आप्पा)बारणे ,पद्मश्री मुरलीकांत पेटकर, प्रा. नटराज जगताप ,पिंपळवण निसर्ग संवर्धन ग्रुप, यांना मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा या अनुषंगाने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .यानंतर नवीन रोटरी मेंबर्सना सहभागी करून घेत त्यांना प्रतिज्ञा देण्यात आली .तसेच चित्रफीतीद्वारे नवीन अध्यक्षांची ओळख करून दिल्यानंतर अध्यक्ष रोट.दत्तात्रय कसाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. नवनियुक्त अध्यक्ष दत्तात्रय कसाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा व नवनवीन समाज उपयोगी निसर्ग संवर्धनात्मक, शैक्षणिक , स्वच्छ्ता अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, छत्र छाया,तसेच क्रीडा प्रकल्प राबवण्याचा ठाम निर्धार करत सर्वांची मने जिंकली यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी थेरगाव रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी समाजासाठी एक वेगळा आदर्श उभा केल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्यानंतर फर्स्ट लेडी रागिनी शहा यांनी शुभेच्छा देत महिला रोटरियन सोनाली गाडे ,रोटरियन रेखा माने, रोट. नीलंबरी जगताप ,रोट. सीमा कसाळे यांना पिनींग करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डीजी रोट. शितल शहा यांनी सर्वांचे कौतुक करत थेरगाव रोटरी क्लबचे पुढील भविष्य हे दैदिप्यमान असणार असल्याची व मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवून सामाजिक सेवा करणार असल्याचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले व थेरगाव रोटरी क्लब हा सर्वात शिस्तप्रिय क्लब असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा देत सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत स्तुती सुमने वाहिली यावेळी नवीन अध्यक्ष दत्तात्रय कसाळे यांचे मातापिता श्री.उत्तमराव कसाळे व सौ.सुमन कसाळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रोट.नरेंद्र माने, रोट.गोपाळ माळेकर ,रोट.विनोद पाटील, मोहन पांचाळ, राहुल शिंदे, सूर्यकांत कसाळे, नामदेव नवले ,प्रदीप पिसाळ, देवेंद्र खाटपे, श्रेणिक पाटील ,महेश खामकर, प्रमोद भोसे, गणेश गांधी या स इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव रोट. विजय भुसारे यांनी केले व यानंतर हे मान्यवर मंचावर उपस्थित होते