“त्या” पाच ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली कुठे ?

0
357

मुंबई,दि. १६(पीसीबी) – राज्यात सोमवारी ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. शिंदे सरकारने विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी अर्थात १३ नोव्हेंबरला दिले आहेत. शिंदे सरकारच्या आदेशात अधिकारी आशीष शर्मा, प्रवीण पुरी,दीपक तावरे, विकास पानसरे आणि अमन मित्तल यांच्या नावाचा सामावेश आहे.

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या –
१. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव IAS आशीष शर्मा यांची (1997) राज्य कर (GST) मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. सहसचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे (मंत्रालय) सहसचिव IAS प्रवीण पुरी (2011) यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक IAS दीपक तावरे (2013) यांची कर्मचारी राज्य विमा योजनाचे आयुक्त (मुंबई) म्हणून करण्यात आली आहे.
४. अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष IAS विकास पानसरे यांची कोकण विभागाचे (मुंबई) अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक IAS अमन मित्तल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या (मंत्रालय) उपसचिवपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.