त्यांच्या काळात आठ वर्षांत मेट्रोचा एक पिलसुध्दा उभा राहिला नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
63

नवी दिल्ली, दि. २९ –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहरातील आणि राज्यातील विविध प्रकल्पांचे आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले. यावेळी पुणे मेट्रोचा इतिहास सांगत विरोधकांनी कसे कामे केली नाही, ते काँग्रेसचे नाव न घेता सांगितले. त्यांचा काळातील आठ वर्षांत मेट्रो प्रकल्पाचा एक पिलरसुद्धा उभा राहिला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत पुणे मेट्रो पुण्यातील अनेक भागांत पोहचली आहे. अजून त्याचा विस्तार होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभाव
पुण्यात मेट्रो खूप आधी येण्यास पाहिजे होती. परंतु मागील काही दशकांत देशातील शहरांचा विकास झाला नाही. प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभाव राहिला. कोणतीही योजना पूर्ण होण्यासाठी अनेक दशके लागत होती. त्या जुन्या वर्क कल्चरमुळे मोठे नुकसान देशाचे आणि पुण्याचे झाले आहे. पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. परंतु काम २०१६ मध्ये सुरु झाले. आमचे सरकार २०१४ मध्ये आला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये मेट्रोची कामे सुरु झाली. आता पुणे मेट्रोचे घौडदौड सुरु आहे. २०१६ पासून आतापर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जुना विचार आणि कार्यपद्धती असती तर एकाही कामे पूर्ण झाली नाही.

महिलांच्या बाबत दुजाभाव
मागील सरकारने आठ वर्षांत मेट्रोचा एक पिलर उभे करु शकले नाही. आमच्या सरकारे मेट्रोचा पुण्यात सर्वत्र विस्तार केला. विकास प्रमाणे महिलांच्या बाबतही मागील सरकारचा दुजाभाव होता, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, मागच्या सरकारने महिलांची एन्ट्री बंद केली होती. मुलींना शाळेचे दरवाजे बंद होते. मुली मोठ्या झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागायची. सैनिक शाळेत महिलांना प्रवेश नव्हता. प्रेगन्सीमध्ये महिलांना नोकरी सोडावी लागायची. आम्ही जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदललं.