तीन जंक्शन बॉक्स चे कुलुप तोडून 18 बॅटरी चोरीला

0
143

चिंचवड, दि.२४ (पीसीबी) – तीन जंक्शन बॉक्स चे कुलूप तोडून चोराने तब्बल 12 बॅटरी चोरल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मोहननगर, चिंचवड येथे घडली आहे.

यावरून यशराज मोहन कारके (वय 21 रा. कोथरूड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जंक्शन बॉक्स चे कुलुप तोडून आरोपीने जंक्शन बॉक्स मधून 45 हजार रुपयांच्या 18 बॅटरी चोरून नेल्या आहेत. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.