तीन कोटी रुपये रोख, ५० किलो सोनं, सोन्याचं मुकूट, काही दागिने, काही जमिनीची कागदपत्रे, १३ काडतुसं…

81

– संशयास्पद मृत्यू झालेल्या महंत नरेंद्र गिरी यांच्या सील केलेली खोलीत सीबीआय पथकाला आढळला खजिना

प्रयागराज, दि. १६ (पीसीबी) : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करत असलेले सीबीआयचे पथक हे गुरुवारी प्रयागराज येथील बागंबरी मठात पोहोचले. महंत नरेंद्र गिरी यांची सील केलेली खोली सीबीआय पथक, पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतांच्या खोलीतून ३ कोटी रुपये रोख रक्कम आणि काही जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करणारे सीबीआयचे पथक गुरुवारी प्रयागराजला पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महंत यांची खोली उघडण्यात आली. त्यामधून तीन कोटी रुपये रोख, ५० किलो सोनं, हनुमानजींचं सोन्याचं मुकूट, काही दागिने, काही जमिनीची कागदपत्रे, १३ काडतुसं आणि सुमारे ९ क्विंटल देशी तूप सापडले. जे महंत बलवीर गिरी यांनी सोपवण्यात आले.

मठाच्या मुख्य गेटजवळ असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महंत नरेंद्र गिरी यांची खोली आहे. महंताच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रयागराज पोलिसांनी मठातील दोन खोल्या सील केल्या होत्या. एक खोली, ज्यामध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह लटकलेला आढळून आला आणि दुसरी खोली ज्यामध्ये महंत नरेंद्र गिरी राहत होते. गुरुवारी ती खोली उघडण्याची कारवाई करण्यात आली.

बाघंब्री मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांनी खोली सुरू उघडण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयच्या पथकाने गुरुवारी पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत खोली उघडली. खोलीतून सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद तयार करण्यात आली. यासोबतच व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफीही करण्यात आली. दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कक्ष आता मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र, ज्या खोलीत महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह लटकलेला आढळला, ती खोली अद्याप उघडलेली नाही.