तासाभरात घरातून मंगळसूत्र चोरीला

0
27

पिंपरी, दि. ४ (पीसीबी)-
राहत्‍या घरातून महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेले. ही घटना कस्‍पटे वस्‍ती, वाकड येथे २६ ऑगस्‍ट रोजी दुपारी साडेअकरा ते साडेबारा वाजताच्‍या सुमारास घडली.
याबाबत ३८ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ३) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला या २६ ऑगस्‍ट रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा या कालावधीत घरी असताना अज्ञात चोरट्याने त्‍यांचे २० ग्रॅम वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.