तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

65

तळेगाव दाभाडे, दि. २९ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणाने पीडित मुलीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 20 मे ते 20 जून या कालावधीत घडली.

सौरभ छगन चव्हाण (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षीय मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर तिला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने मुलीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.