तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल !

116

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – तरुणीला खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत दोघांनी तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

संजय कांबळे (वय 45, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी), महिला (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घराच्या टेरेसवरील टाकीतील पाणी आणण्यासाठी गेल्या असता आरोपी टाकीला लावलेल्या पाईपचा कॉक तोडून नुकसान करत होता. फिर्यादींनी त्याला कॉक तोडू नका, असे म्हटले. त्यावरून आरोपी महिलेने फिर्यादीला खोट्या गुन्ह्यात अडकवते अशी धमकी देऊन तरुणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.