तरुणास कोयत्याने मारहाण; आरोपीला अटक

0
67

भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – तू मला शोधत आहेस का, असे म्हणत एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना फुलेनगर, भोसरी येथे रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.रूतीक दिलीप कदम (वय 19, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 5) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोईन इस्माईल शेख (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुतीक व त्याचा मित्र गोपाळ लोंढे हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी याने त्यांना अडविले. तू कशाल आला आहेस, तू मला शोधत आहे का, असे म्हणत झाडावर ठेवलेला कोयता काढून फिर्यादी रूतीक याच्या डोकयात, खांद्यावर कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.