तरुणाला डोक्याला बंदूक लावून लुटले

89

वाकड, दि. ११ मे (पीसीबी) – तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तरुणाला डोक्याला बंदूक लावूनलुटण्यात आले. हा प्रकार कुरळी येथे 8 मे रोजी घडला असून महाळूंगे एमआयडीसी पोलिसांनीदोघाना अटक केली आहे.

याप्रकरणी जयराम भौरा मुंडा (वय 28 रा.कुरुळी) यांनी बुधवारी (दि.10) महाळुंगेएमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आदेश मदन क़ड (वय 23 रा.कडाचीवाडी, खेड)विशाल प्रकाश वाणी (वय 23 रा.कडाचीवाडी) यांना अटक केली असून अल्पवयीन मुलगाव सत्यम कड (रा. क़डाचीवाडी) यांच्यावरगुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रसत्याने पायी जात असतानाआरोपीदुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीलातंबाखू मागण्याचा बहाणा केला. फिर्यादी तंबाखू देत असताना आरोपींनी फिर्यादीचे हातपकडले व खिशातील पैसे काढण्याचा प्रय़त्न केला. फिर्यादींनी प्रतिकार केला अशताआरोपींनी थेट लोखंडी पिस्टल फिर्यादीच्या डोक्याला पिस्टल लावू ओरण बंद कर नाही तरमारून टाकीन अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीच्या खिशातून 700 रुपयांचा मोबाईल व40 रुपये घेतले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.