“डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर…” विजय वडेट्टीवार म्हणतात…

143

परभणी,दि.२०(पीसीबी) – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं विधान केलं. “डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. परभणी येथे रविवारी (१९ नोव्हेंबर) थायलंड येथील सहा फूट उंचीच्या ५० बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास वडेट्टीवार बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यात मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार आला असता, तर या भारताचे दोन तुकडे करावे लागले असते. आज वर दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार आपण केला पाहिजे.”

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मंदिरातील पुजाऱ्यांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मंदिरातील दानपेट्या काढून टाकल्या, तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही.” वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.