डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

29

आळदी, दि. ११ (पीसीबी) -भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 10) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आळंदी येथे गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ घडला.

प्रीती सिरस्कार असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आशिष सिरस्कार (वय 35, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/डीएम 3287) चालक लीलेश्वर डोमाजी शेळके (रा. केळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष यांच्या बहिण प्रीती या त्यांच्या दुचाकी (एमएच 14/एलडी 8180) वरून आळंदीच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी भरधाव आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये प्रीती रस्त्यावर पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात प्रीती यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.