डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

365

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी)- भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी पावणे नऊ वाजता विप्रो सर्कल, फेज एक, हिंजवडी येथे घडली.

दिनकर बबन सुतार (वय 41, रा. मुळशी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर यांचे बंधू भाऊ बबन सुतार (वय 50) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/एचयु 60006) चालक बाळासाहेब बलभीम बावटे (वय 34, रा. माण, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ दिनकर हे त्यांच्या दुचाकीवरून कंपनीत कामावर जात होते. ते विप्रो सर्कल येथे आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या एका डंपरने धडक दिली. त्यामध्ये दिनकर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.