डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
121

पुणे, दि. १९ (पीसीबी): वडिलांसोबत कामावर निघालेल्या तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास भाम फाटा रोहकल रोड चाकण येथे घडला घडली.

कुणाल संतोष सावंत (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष किसन सावंत (वय 46, रा. शिरोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ सुखदेव कदम (वय 36, रा. काळुस, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सात वाजता फिर्यादी संतोष आणि त्यांचा मुलगा कुणाल हे कंपनीत कामावर निघाले होते. संतोष हे गाडी चालवत होते. ते नाशिक ते पुणे रस्त्याने जात असताना भाम फाटा येथे वळण घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. यामध्ये संतोष हे गंभीर जखमी झाले. तर त्यांचा मुलगा कुणाला याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.