ट्रेलरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
160

चिखली, दि.९ (पीसीबी) – दुचाकी व ट्रेलरच्या अपघातात ट्रेलरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चिखलीतील कुदळवाडी येथे 17 जानेवारी रोजी घडला होता.

याप्रकरणी गुरुवारी (दि.8) संदिपकुमार लक्ष्मण बिंद (वय 20 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एम.एच.14 एच.यु.7437 याट्रेलरच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.या अपघातात हिरालाल नानहक कुमार (वय 20) असे मयत इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचे हिरालाल हे त्यांचे मेहुणा बिरेश कुमार सुरेंदर बिंद (वय 18) याच्यासज दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रेलर हयगयीने चालवून हिरालाल यांच्या गाडीला धडक दिली. यात ते खाली पडले असता त्यांच्या अंगावरून व डोक्यावरून गाडीचे चाक घालवले. यात हिरालाल यांचा मृत्यू झाला. यामध्ये बिरेशकुमार हा गंभीर जखमी झाला आहे. यावरून चिखली पोलिसांनी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.