ट्रेडिंग अॅपद्वारे १२ लाखांची फसवणूक

138

रावेत, दि. २४ (पीसीबी) – ट्रेडिंग अॅपद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यक्तीची ११ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २८ मार्च ते २६ जुलै २०२२ या कालावधीत डिव्हाईन काऊज अॅपवर रावेत परिसरात घडला.

आशीर्वाद मुकुंद उगे (वय ३८, रा. रावेत) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २३) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उगे यांना एसएमएस आला. त्यात डिव्हाईन काऊज अॅपची माहिती देण्यात आली होती. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात माहिती दिसल्याने उगे यांनी त्यात ११ लाख ९९ हजार रुपये गुंतवणूक केली. त्यात त्यांना फायदा देखील झाला. मात्र अचानक अॅपमधून सर्व माहिती डिलीट होऊन उगे यांची फसवणूक झाली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.