ट्रेडिंगच्या बहाण्याने 12 लाखांचा गंडा

0
353

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून 12 लाख 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 6 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9821122702, 9930303927, 8537840027, 9820461010, 8281443147, 8091281474, 9818555008, 7972586131, WWW.CAPITALIX.COM या लिंकचे वापरकर्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून त्यांना WWW.CAPITALIX.COM यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्याकडून 12 लाख 50 हजार 94 रुपये रक्कम घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.