ट्रांजेक्शनचे कन्फर्मेशन मागत बँक खात्यातून सव्वा दोन लाख केले हडप

163

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – सध्या ऑनलाईन पद्धतीने विविध फंडे वापरत तुमचे बँक खाते रिकामी केली जात आहे. यामध्ये टास्क देणे किंवा केवायसी करणे क्रेडिट कार्ड संबंधित समस्या अशा स्वरूपाचे तुम्हाला आमिष दाखवले जाते. मात्र चिंचवड येथील एका घटनेत महिलेला खात्यातील ट्रांजेक्शनचे कन्फर्मेशन मागण्याचा बहाना करत खात्यातून तब्बल सव्वा दोन लाख गायब करण्यात आले आहेत. ही घटना 8 ऑगस्ट 2023 रोजी चिंचवड येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.

या प्रकरणी 40 वर्षीय महिलेने गुरुवारी(दि.14) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी PAYU PAYMENTS BANK या बँकेतील खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांना आयसीआयसीआय बँकेतून तुमच्या खात्यातून एक लाख 23 हजार 767 रुपये यांचे ट्रांजेक्शन झाले आहे. ते तुम्ही केले असल्यास 1 दाबा किंवा केले नसल्यास 9 दाबा असा सांगणारा फोन आला. त्यानुसार फिर्यादी यांनी ट्रांजेक्शन केले नसल्याने 9 दाबले मात्र फिर्यादी यांच्या खात्यातून तातडीने 2 लाख 23 हजार 768 रुपये गायब झाले.फिर्यादी यांना आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अनोळखी व्यक्ती,फोन कॉल किंवा एसएमएस तसेच लिंक ला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका असे आवाहन नागरिकांना केले आहे.