ट्रक चालकाने केला 11 लाखांच्या मालाचा अपहार

0
47

महाळुंगे, दि. 05 (पीसीबी) : भंगार माल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने 11 लाख 62 हजार रुपयांच्या मालाचा अपहार केला. ही घटना 27 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत कुरुळी येथे घडली.

उमेश दिलीप राठोड (रा. कवडीपुरा, ता. पुसद, यवतमाळ), अनिल गायकवाड (रा. भोजलावालतूर, यवतमाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयप्रकाश रामराज तिवारी (वय 31, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या कंपनीमधून आरोपी उमेश याच्या ट्रकमध्ये 27 टन 140 किलो वजनाचा 11 लाख 62 हजार 514 किमतीचा भंगार माल जालना येथे पोहोचवण्यासाठी दिला. आरोपी ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराने ट्रक मधील सर्व भंगारमालाची परस्पर विक्री करून अपहार केला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.