ट्रकच्या धडकेत दुचाकावरील तरूणीचा मृत्यू

0
264

पुणे, दि. १६ (पीसीबी) : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.14) आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पीटल सोमर घडली आहे.

याप्रकरणी महेश दत्तात्रय लोखंडे (वय 39 रा.तळेगाव दाभाडे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एमएच 14 सीपी3181 या क्रमांच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर या या अपघातात नेहा पांडुरंग जोशी (वय 23 रा. मुलुंड, मुंबई) असे मयत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या नेहा हे दोघे फिर्यादी यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक बेदरकारपणे व वेगाने चालवून फिर्यादीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादी खाव नेहा दोघे खाली पडले यात पिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत तर नेहा यांचा मात्र या अपघातात मृत्यू झाला आहे. आळंदी पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसत्याचा शोध घेत आहेत.