ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

0
103

ट्रक रिव्हर्स येत असताना ट्रक आणि लोखंडी गेट यांच्या मध्ये अडकल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास एच पी गॅस गोडाऊनच्या समोर पाईट येथे घडली.

सुखराम भियाराम खिलेरीया (वय 38, रा. मगरानगर हनिया, ता. बावरी, जि. जोधपुर) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण श्रीराम घोलप (वय 62, रा. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश महादेव लष्करे (वय 32, रा. चिंबळी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लष्करे हा त्याच्या ताब्यातील ट्रक गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोर रिव्हर्स घेत होता. त्यावेळी फिर्यादी यांचा कामगार सुखराम हा ट्रकच्या पाठीमागे होता. ट्रक आणि एजन्सीचे लोखंडी गेट यांच्या मध्ये तो अडकला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.