टास्कच्या नावाखाली 41 लाखांची फसवणूक

0
38

दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) भोसरी,

फेसबुक टास्क पूर्ण करण्यास सांगून एका तरुणाची 40 लाख 94 हजार 475 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 26 नोव्हेंबर 2023 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत कासारवाडी येथे घडली.
मंगेश मोहन जारकड (वय 30, रा. कासारवाडी) यांनी रविवारी (दि. 4) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9416962965 या मोबाइल नंबर धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश हे घरी असताना आरोपी फिर्यादी यांच्या व्हॉटस्अपवर टेलिग्राम आयडी मेसेज केला. फेसबुक टास्क पूर्ण करायला सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या बँक खात्यावर 40 लाख 94 हजार 475 रुपये घेऊन ऑनलाइन फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.