ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

120

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक नागनाथ कोतापल्ले याचं अल्पशा आजारानं निधन झालं आहे, ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. पिंपळे सौदागर येथे गेली काही वर्षांपासून ते कायमचे रहिवासी होते. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

एक वर्षापूर्वी डॉ. कोत्तापल्ले यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून पिंपरी- चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.