ज्यांना स्वतःला निवडून येता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात

201

पुणे, दि. २५ (पीसीबी) : उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खोपोली येथे अनंत गीते यांनी मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे यांचा पराभव होईल, असे वक्तव्य केले होते. त्याचा वक्तव्याचा आता खासदार श्रीरंग बारणे यांनी समाचार घेत ज्यांना स्वतःला निवडून येता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात याबाबत येणारा काळ ठरवेल अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.

मावळ तालुक्यातील वडगाव येथे पंचायत समिती येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे प्रतिउत्तर दिले आहे. अनंत गीते यांनी रायगड लोकसेभेसाठी पुन्हा एकदा तयारी सुरू केल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी आपल्याला रायगड आणि रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या जागेवरून आपण लढणार असल्याचे देखील गीते म्हणाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात खासदार सुनील तटकरे यांना आव्हान देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

अनंत गीते यांनी मतदार संघातील कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी विरोधकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर टीका केली आहे. त्या टीकेला बारणे यांनी उत्तर दिले आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना धारेवर धरले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.