जेसीबी चालकाला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

0
128

चिखली, दि. १५ (पीसीबी) – जेसीबी चालक जेसीबीने एका प्लॉट मध्ये लेवल करण्याचे काम करत होता. त्यावेळी तिथे आलेल्या चौघांनी जेसीबी चालकाला मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी जाधववाडी, चिखली येथे घडली.

विठ्ठल चव्हाण, गोकुळ चव्हाण, आतिश चव्हाण आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमर अशोक चांगभले (वय 38, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जेसीबीने राहुल जाधव यांच्या जाधववाडी येथील प्लॉटवर लेवल करण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी ‘ही आमची जागा आहे. टू कसाकाय लेवल करतो’ असे म्हणून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.