जुन्या भांडणाच्या कारणावरून घराची तोडफोड; रोख रकमेची चोरी

0
291

चिखली,दि. १६ (पीसीबी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईक तरुणाने घरात तोडफोड करून नुकसान केले. तसेच घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या कालावधीत ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडली.

बापूराव यशवंत ठोंबरे (वय 67, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समाधान बाळू महानवर (वय 24, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठोंबरे हे घराला कुलूप लाऊन बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या मेहुण्याचा मुलगा समाधान याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून घरात तोडफोड केली. दरवाजाचे कुलूप तोडून घरातील टीव्ही, फर्निचर, दोन दुचाकींची तोडफोड करून मोठे नुकसान केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून 50 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.