जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरूणावर प्राणघातक हल्ला

491
चिखली, दि.२५ (पीसीबी) – जुन्या भांडणाचा राग मनात धरून हल्लेखोरांनी दोन तरूणांवर लाथ्या बुक्क्यांनी, लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना दि.२४ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० च्या सुमारास नर्सिंग हौसींग सोसायटी सी./२८ घरकुल चिखली, पुणे. या ठिकाणी घडली. याप्रकरणी आरोपींविरोधात फिर्यादीने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापी आरोपींना अटक केली नाही.
मन्नु कोरी, विकास उर्फ पंग्या जाधव, जय करसुळे, जुनेत उर्फ आण्णवा, मोन्या, सोयल्या उर्फ चिप्स, हे सर्व रा.घरकुल चिखली पुणे असे या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या तक्रारीनुसार, फिर्यादीचा मुलगा सुहास उर्फ पिल्ल्या आणि आकाश यांची आरोपी मन्नु कोरी आणि विकास उर्फ पांग्या जाधव याच्या सोबत काही दिवसापूर्वी भांडण झाले होते त्याच भांडणाचा राग मनात धरून सुहास आणि आकाश याला हल्लेखोरांनी लोखंडी सळई, लाथ्याबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केले. फिर्यादी  भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता मन्नू कोरी आणि विकास उर्फ पंग्या जाधव यांनी आकाश वर कोयत्याने वार करून फिर्यादीलाही खाली ढकलून  त्यांच्यावरही कोयत्याने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रस्त्याने जाणारे लोकांनाही मारहाण करून आरोपींनी तिथून पळ काढला असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सोलापूरे करीत आहेत.   
WhatsAppShare