जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर चाकूने वार

0
531

पिंपळे गुरव, दि. १२ (पीसीबी) – जुन्या भांडणाचा राग मनात धरून 24 वर्षीय तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहेत. ही घटना पिंपळे गुरव येथे 10 फेब्रुवारी रोजी पिंपळे गुरव येथे झाली आहे.

सौरभ अनिल वाल्मिकी (वय 24 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून राहुल भोसले (रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी व फिर्यादी हे त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाला गेले. वाढदिवस झाल्या नंतर फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून आरोपीला घरी सोडण्यासाठी गेले तेथे त्यांनी आरोपीला सोडले असता आरोपीने सकाळी झालेल्या भांडणाचा रागणात धरून फिर्यदिला शिवीगाळ केली व त्यांच्यावर चाकूने वार करत जखमी केले. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील.तपास करत आहेत.