जागेवर ताबा मारण्याची धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी

0
1287

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – जागेवर ताबा मारण्याची धमकी देत एकाने व्यावसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागितली. ही घटना जुलै ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या बाहेर आणि इंद्रायणी नगर येथील शॉपवर तसेच हडपसर येथे घडली.

सतीश राठोड (रा. डुडुळगाव, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हेमंत विजय उदावंत (वय 54, रा. हडपसर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे भागीदार संदीप कोद्रे यांच्यात एमआयडीसी मधील एका जागेबाबत समझोता झाला आहे. आरोपीचा त्या जागेशी काहीही संबंध नसताना त्याने जबरदस्तीने फिर्यादी यांना संदीप कोद्रे बरोबरचा व्यवहार पूर्ण करा नाहीतर मी जागेचा ताबा घेईल, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.