जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

0
284

आळंदी, दि. १ (पीसीबी) – जागेवर अतिक्रमण करून शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ऑगस्ट ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आळंदी येथे घडली.

विश्वनाथ गोविंदराव गुट्टे (रा. आळंदी ग्रामीण, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप नंदकुमार कारेकर (वय 38, रा. आळंदी देवाची, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या नावावर असलेल्या जागेत आरोपीने कार पार्क केली. तसेच त्या जागेत सेंट्रिंगच्या फळ्या टाकून जागेवर अतिक्रमण केले. याबाबत विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.