जागा मोजून बांधकाम करण्यास सांगितल्याने एकास मारहाण

0
463

कोयाळी दि. १६ (पीसीबी) : जागा मोजून बांधकाम करा, असे म्हटल्याने एका तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 15) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास कोयाळी, शिववस्ती येथे घडली.

सुभाष रामदास गायकवाड (वय 38) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन नथुराम गायकवाड (वय 27, रा. शिववस्ती, कोयाळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष आणि त्यांचे वडील रामदास गायकवाड हे नेहमीप्रमाणे शेतातील कामे करण्यासाठी शेतावर गेले होते. त्यांच्या शेजारी नथुराम गायकवाड यांचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी जागा मोजून बांधकाम करा, असे नथुराम यांना सांगितले. त्या कारणावरून नथुराम यांचा मुलगा सचिन याने फिर्यादी यांचे वडील आणि चुलत भाऊ रामा बापू गायकवाड यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी सेंट्रींग बार रामदास गायकवाड यांच्या मानेवर मारला. यात ते जखमी झाले आहेत. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.