‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे यांची मुलाखत

123

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांना स्वच्छ व निर्मळ अन्न मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती काळजी घेत आहे. ग्राहकांनी स्वतःच्या सवयींमध्ये कोणते बदल केले पाहिजेत हे दाखवणारी ही मुलाखत सुमारे दररोज दहा लाख कुटुंबांकडून महाराष्ट्रात ऐकली जात असते अशा दिलखुलास कार्यक्रमांमध्ये तीन दिवस सलग सादर केली जाणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘अन्न व औषध प्रशासन विभागाच्या योजना आणि उपक्रम’ या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यातील नागरिकांचे भेसळयुक्त, अयोग्य अन्नपदार्थ व औषधांपासून संरक्षण करण्यासाठी शासनस्तरावर अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने कार्यरत आहे. या विभागामार्फत राज्यात विकली जात असलेली औषधे, भेसळयुक्त खाद्यपदार्थ हे नागरिकांसाठी वापरण्यास सुरक्षित आहेत किंवा नाहीत यासाठी कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येते. त्याचबरोबर विभागामार्फत कोणत्या योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. या विषयावर सविस्तर माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री. काळे यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आयुक्त श्री. काळे यांची मुलाखत गुरुवार दि. 16, शुक्रवार दि.17 आणि शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.