जमिनीवर मोजणी आल्याच्या रागातून दोघांना मारहाण

207

चाकण, दि. १९ (पीसीबी) – जमिनीवर मोजणी आल्याने दोघांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी पवळेवाडी काळूस येथे घडली.

निलेश देवराम पवळे (वय ३२, रा. पवळेवाडी काळूस, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू बबन पवळे आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय मारुती चव्हाण यांची मोजणी सुरु असताना आरोपी फिर्यादी यांच्याकडे आले. तुझ्यामुळे मोजणी सुरु आहे. आमच्या जमिनीवर ताबा घ्यायचे सुरु आहे. याला सर्वस्वी तू जबाबदार आहे, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. दोन दिवसात तू दिसणार नाही. तुला जीवे ठार मारतो अशी आरोपींनी धमकी दिली. फिर्यादी यांची आई भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.