जमिनीचे पैसे मूळ मालकाला न देता सव्वासात लाखांची फसवणूक

107

शिरगाव, दि. १० (पीसीबी) – मध्यस्थीने जमिनीचे पैसे मूळ मालकाला न देता स्वतःकडे ठेऊन फसवणूक केली. हा प्रकार 22 जानेवारी 2017 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील शिरगाव येथे घडला.

दशरथ सत्यप्पा बनसोडे (वय 40, रा. रहाटणी) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित अशोक ठोकळे (रा. शिरगाव, ता. मावळ), शैलेश रमेश देशमुख (रा. टेंभूरखेडा वरुड, जि. अमरावती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी विक्री करण्यासाठी मध्यस्थी नेमलेल्या दोन व्यक्तींनी जमिनीच्या मूळ मालकाला खरेदीदाराकडून घेतलेले पैसे न देता फसवणूक केली. 22 हजार 900 चौरस फुटांच्या प्लॉटचे ठरल्याप्रमाणे सात लाख 26 हजार रुपये मध्यस्थीने घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.