जबरी चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

0
42

नातू सह रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या अंगावरील दागिने दोन महिलांनी जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कृष्णा नगर, चिंचवड येथे घडली.

इंदुबाई निवृत्ती महाडिक (वय 55, रा. कृष्णा नगर पोलीस वसाहत, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी या आपल्या नातूसह रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्या कृष्णा नगर येथील गणगे शाळेजवळ आल्‍या असता दोन महिला पाठीमागून आल्या त्यातील एका महिलेने फिर्यादीचे डोळे हाताने पकडले. दुसऱ्या महिलेने तुझे गळ्यातले मंगळसूत्र काढून दे नाहीतर तुझ्या नातवाला पळवून नेऊ, अशी धमकी देत महिलेच्या अंगावरील 61 हजार रुपये किमतीचे दहा ग्राम वजनाचे दागिने चोरून नेले.