चौघांकडून दाम्पत्यास मारहाण

129

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून पती-पत्नीस बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजता केळगाव, ता. खेड येथे घडली. भीमा शंकर वाघुंडे, ऋषिधर वाघुंडे आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारा भीमा शंकर वाघुंडे याने त्याच्या कुटुंबियांसह मिळून फिर्यादी महिलेच्या पतीला मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेल्या असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.