चोरीचा खोटा आरोप करत बेदम मारहाण

0
677

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – चोरीचा खोटा आरोप करत एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. चप्पल शिवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू पायावर मारून फ्रॅक्चर केले. ही घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी लांडेवाडी भोसरी येथे घडली.

किशोर दिलीप चौरे (वय 32, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय जगताप (रा. दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र दिनेश वानखेडे याने फिर्यादीकडे मोबाईल फोन चार्जिंगसाठी दिला. चार्जिंग झाल्यानंतर फोन मित्राला देणयासाठी जात असताना आरोपीने फिर्यादीला अडवले. ‘तू माझ्या मित्राचा मोबाईल चोरला आहे. तू चोऱ्या करतो’ असा खोटा आरोप करत आरोपीने शिवीगाळ केली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या ताप्रीवरील चप्पल शिवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू फिर्यादीच्या पायावर मारून त्यांना फ्रॅक्चर केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.