चोरलेल्या गॅसची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री; एकास अटक

0
55

चिखली, दि. १९ (पीसीबी) – घरगुती वापराच्या सिलेंडर मधून चोरून गॅस काढून तो गॅस लहान टाक्यांमध्ये भरून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 18) दुपारी एक वाजताच्या सुमारास नेवाळे वस्ती चिखली येथे करण्यात आली.

सागर रमेश वाघमारे (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह प्रशांत दौंडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार शैलेश मगर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून रिफिलिंग सर्किटच्या सहाय्याने धोकादायकरित्या कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता चोरून गॅस काढला. हा गॅस लहान सिलेंडर मध्ये काढून हे सिलेंडर काळ्या बाजारात चढ्या दराने विकले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दरोडा विरोधी पथकाने कारवाई करत आठ लाख वीस हजारांचा ऐवज जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.