चिटफंड कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने नागरिकांची 80 लाखांची फसवणूक

165

पिंपरी दि. २ (पीसीबी) -चिटफंड कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला डिव्हीडंट देतो, असे अमिश दाखवून नागरिकांकडून 80 लाख 70 हजार 647 रुपयांच्या ठेवी घेत फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2019 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडला.

कडवील मॅथ्यू बाबू (वय 75, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेकब जॉर्ज (वय 58, रा. बोपोडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि इतर सभासदांना त्याच्या चिटफंड कंपनीत गुंतवणूक करा चांगला डिव्हीडंट देतो, असे आमिष दाखवले. आरोपीकडे नागरिकांनी 80 लाख 70 हजार 647 रुपये ठेव ठेवली. या ठेवी आरोपीने परत न देता पैशांचा अपहार करून फसवणूक केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.